तुळजापूर शहरात वीज बिलाच्या नावाखाली एका व्यक्तीला ३०९७५ हजाराला गंडवले

Advertisements
Ad 17
Advertisements
Advertisements

तुळजापूर दि 18 प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील अपसिंगा रोड येथील रहात असलेले शिक्षक प्रकाश भगवाण साळवी च्या खात्यातून ३० हजार ९७५ रूपये एका वेळी काढण्यात आले.

वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन कट केले जाईल, असे खोटे सांगून एक शिक्षक प्रकाश भगवाण साळवी च्या खात्यातून ३० हजार ९७५ रूपये काही वेळात काढून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.आपली फसवणूक झाल्याचे संबंधीत शिक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धावघेवुन पोलिस सहाय्यक निरिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली सायबर क्राईम विभाग उस्मानाबाद येथे तक्रार नोंदवली आहे.

फिर्यादीच्य मोबाईलवर फेक अ‍ॅपवरूण मेशेज करून लाईट बील अपडेट करायचे सांगुन समोरील व्यक्तीने तोतयागिरी करून फिर्यादीच्या बँक खात्यातून एकाचवेळी ३० हजार ९७५ रूपये काढून फसवणूक केली आहे. 

सायबर क्राईम विभाग उस्मानाबाद पोलिसांनी मोबाईल नंबरवरील अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सायबर क्राईम करीत आहेत.

हा प्रकार दि.१५ जानेवारी सायंकाळी ७:०० वा. समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *