12 जानेवारी ते 19 जानेवारी विवेकानंद जयंती सप्ताहात 7 दिवस कार्यक्रम

Advertisements
Ad 17
Advertisements
Advertisements

तुळजापूर दि 18 प्रतिनिधी

 ज्ञान शिदोरी उपक्रम दिन  17 जानेवारी 2023 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी दिन उपक्रम साजरा करण्यात आले. या निमित्ताने वर्तमानपत्राची उपयुक्तता या विषयावर पत्रकार डॉ. सतीश महामुनी यांची व्याख्यान संपन्न झाले

 शाळेतील सर्व विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्ते यांच्या वतीने साहेबांना खूप खूप शुभेच्छा  देण्यात आले . याप्रसंगी पत्रकार डॉ. सतीश महामुनी यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांना शुभेच्छा दिल्या .इयत्ता दहावी क च्या वर्गाकडून गरीब होतकरु विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्यात आले .दहावी विद्यार्थी व वर्गशिक्षक श्री घोरपडे  यांच्या वतीने शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना पेन, वहया वाटप करण्यात आले.

याप्रसंगी वृत्तपत्राची उपयुक्तता या विषयावर मार्गदर्शन करताना वर्तमानपत्राचा इतिहास वर्तमानपत्राचे स्वरूप आणि वर्तमानपत्राचे होणारे वेगवेगळे फायदे या विषयावर डॉ. सतीश महामुनी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेतील पर्यवेक्षक श्री काशीद सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती मोकाशी .एस ए. क्षीरसागर के.टी.  व श्री कुंभार सर शाळेतील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *