लिटल फ्लावर्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला आनंद बाजारचा आनंद

Advertisements
Ad 17
Advertisements
Advertisements

लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेत आनंद बाजार उत्साहात साजरा

तुळजापूर दिनांक 4 प्रतिनिधी

लिटल फ्लॉवर  मराठी माध्यम प्रशालेमध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये भरवलेला आनंद बाजार पालक आणि विद्यार्थ्यांना भरभरून आनंद देऊन गेला छोटे छोटे विद्यार्थी वस्तू विक्री करण्याचा आनंद लुटत असताना दिसून आले. 

तुळजापूर येथील लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंद बाजार भरवण्यात आला होता. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या बाजारात खाद्यपदार्थांबरोबरच पुस्तक विक्री, सौंदर्यप्रसाधने, स्टेशनरी अशी देखील दुकाने विद्यार्थ्यांनी उभारली होती. या दुकानांमधून शिक्षकांबरोबरच पालकांनी देखील खरेदी करून मुलांच्या उत्साहाला छान प्रतिसाद दिला. प्रशालेच्या या उपक्रमाचे पालकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद लुटला. विद्यार्थ्याचे सामान्य ज्ञान आणि व्यवहारी ज्ञान अवगत होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्याची संयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *