JEE परीक्षेत तुळजापूरच्या आर्यन हंगरगेकर याची चमकदार कामगिरी

Advertisements
Ad 17
Advertisements
Advertisements

तुळजापूर दिनांक 20 प्रतिनिधी

तुळजापूर येथील माजी नगरसेवक अमर हंगरगेकर यांचे चिरंजीव आर्यन अमर हंगरगेकर याने बारावी विज्ञान शाखेमधून JEE Main या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहेत या परीक्षेत त्याने 97% गुण प्राप्त केले असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

त्याच्या या यशाबद्दल तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे विशेष अभिनंदन केले महत्त्वाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि त्याची मूळ बौद्धिक क्षमता याचा कस लागतो आणि आर्यन हंगरेकर यांनी या कसोटीवर मात करून हे यश संपादन केले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे आपण त्याचे अभिनंदन करीत आहोत अशा शब्दात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आर्यन हंगरगेकर यांचे कौतुक केले. तुळजापूर शहरातील आर्यन हंगरगेकर यांचे नातेवाईक मित्रपरिवार आणि शिक्षक वृंद यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *