जळगाव येथे मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांच्या उपस्थितीत वसुंधरा दिन

Advertisements
Ad 17
Advertisements
Advertisements

जळगाव / तुळजापूर दिनांक 22 प्रतिनिधी

जागतिक वसुंधरा दिना निमित्त संस्कार भारती जळगाव भू अलंकरण विभागातर्फे छत्रपती संभाजी महाराज नाट्य गृह जळगाव येथे भव्य आकर्षक संस्कार भारती रांगोळी काढण्यात आली.
याप्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते , नाट्य कलावंत संदीप पाठक यांनी वसुंधरा पूजन केले. याप्रसंगी बोलताना श्री.पाठक यांनी संस्कार भारती च्या कार्याची प्रशंसा केली.श्री.पाठक त्यांच्या ‘ वऱ्हाड निघालंय लंडनला ‘ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.संस्कार भारतीचे कलासाधक,रांगोळी विभागाच्या गीता रावतोळे , संगीता पिंगळे , वर्षा बऱ्हाटे, हर्षदा कासार ई.नी परिश्रम घेतले. मोहन रावतोळे , प्रमोद जोशी,राजेंद्र माने ,भगवंत फडणीस ,अनिल पाटील , भागवत बऱ्हाटे आदी उपस्थित होते.शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *